Thursday, January 21, 2016
भगवान बाबांचे महात्म्य
आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत
भगवानबाबा (जन्म : २९ जुलै , इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट,
पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल
क्लिनिक, पुणे ) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील
थोर संत आहेत. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्गुरू संत
तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला
पोहोचलेले ते पहिले महापुरूष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम
महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता असे मानले जाते.
तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे
महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील
नाथफडाचे/पैथनकर फडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते
भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते
कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका
सांगितली जाते की त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे
पारायण केले होते. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी
इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग
करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केला.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात
कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व
सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व
ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.
तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून
त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन
म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या
कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट
रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी
त्यांनी मराठवाडा , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह
उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार
करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता
यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला.
त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व
कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा
प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे
आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक
रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व
पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे.
वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना त्यांनी केली.
सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मुलन, शिक्षणप्रसार, वार्षिक
नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे
काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक
होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड
आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. [१]
सानप घराण्याची पूर्वपीठिका
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात संत
महाराष्ट्रात होऊन गेले त्यांच्यापैकी संत श्री भगवानबाबा
हे एक होते.भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत
जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि
वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव
सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते
आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत.
घराणे सदाचारी, संपन्न व लौकिकवान होते. घराण्यात
अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी
होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील
शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील
पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी
स्थायिक झाले होते. तेथे त्यांची बरीच मोठी शेतजमीन
होती.
भगवानबाबा यांच्या जन्माच्या आधीपासूनच सानप
कुटुंबाला काही अद्भूत गोष्टींची अनुभुती येत होती.
कौतिकाबाई गरोदर असताना त्यांना पांडुरंगाचा
साक्षात्कार झाला होता, असे सांगितले जाते. आपल्या
पोटी जन्माला येणारे हे बाळ महान आहे, याची जाणीव
कौतिकाबाईंना झाली होती. त्या गरोदर असतानाच
सावरगावात अखंड विठ्ठलनाम सप्ताह चालू होता.
सप्ताहात भावार्थ रामायण कथा सुरू होती. या कथेला
कौतिकाबाई भक्तिभावाने जात असत. हनुमंतांची भक्ती
पाहून कौतिकाबाईंच्या मनात आले की, अंजनीच्या पोटी
जसा हनुमान जन्मला तसाच माझ्या पोटीही भक्तिसंपन्न
पुत्र जन्माला यावा. त्याच रात्री त्यांना स्वप्नात
साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले. पांडुंरग आपल्याला
आशीर्वाद देत आहे असे त्यांना जाणवले.
जन्म आणि बालपण
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट
सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स.
१८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी
भगवानबाबांचा जन्म झाला. जन्मसमयी वाड्यामध्ये १०८
दिवे लागले, असे सांगतात. बारशाच्यावेळी मुलाचे नाव
'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे
भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. आबाजी
हे कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
लहानपणापासूनच आबाजी खूपच हुशार, अत्यंत तल्लख बुद्धी,
चाणाक्ष स्मरणशक्ती आणि निर्भयी वृत्तीचा होता.
भगवानबाबा लहानपणापासुनच अतिशय हुशार आणी चंचल
होते. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचेच असा त्याचा
निश्चयही होता. गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा
गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना
त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे
पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा
गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार
गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची
निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक
वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक
ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली.
आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे.
पंढरपूरचा विठ्ठल हेच त्याचे परमदैवत होते. याच वयात
त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील
प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस
गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण
होते' असे म्हणून त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत
पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी
घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. विठ्ठलदर्शन
झाल्यावर आबाजीचे मन गहिवरले आणि त्यांनी संपूर्ण
जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. भक्त
पुंडलिकाच्या गावी पंढरपूरला गीतेबाबांनी आबाजीच्या
गळ्यात पवितर तुळशीमाळ घातली आणि त्यांना
गीतेबाबा हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. त्यानंतरही
अनेकदा वारीचा आनंद त्यांनी घेतला. पंढरपूरच्या वारीवरुन
गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील
पवनपुत्र हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही
बातमी कळताच ते धावतच मंदिरात आले. तेव्हा लहान
आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान
आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह
स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
अध्यात्म, परमार्थाबद्दलची ओढ आबाजीचे प्रपंचात मन रमू
देत नव्हती. एके दिवशी सावरगावी कोणीतरी दीक्षा
देणारे गुरू आले होते. ते पाहून लहान आबाजी गुरूपदेश
घेण्यासाठी घरच्यांना विनवू लागला. आबाजीचे पूर्वज हे
लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते.
नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरेचे गुरू म्हणून लाभले होते.
तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते.
आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या
दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे
आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी
नारायणगडावर आले. तेथे वडील तुबाजीरावांनी
आबाजीला माणिकबाबाच्या पायावर घातले. आबाजीने
माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात
गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण
आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. आबाजीने
नारायणगडावर राहण्यांचा हट्ट धरला आणि बराच वेळा
अनुग्रह दे म्हणुन आग्रह केल्यानंतर रागावून माणिकबाबांनी
तू नारायणगडावरील मंदिराच्या शिखरावरून उडी मार असे
म्हणाले. काही क्षणातच आबाजीने नारायणगडावरील
मंदिराच्या शिखरावरून माणिकबाबांचे नाव घेत उडी
मारली पण त्याला थोडेसेही खरचटले नाही.
माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत
आबाजी उत्तीर्ण झाले होते. त्याच्या साहसीपणाचे
माणिकबाबांनी तोंड भरून कौतुक केले. आबाजीची भक्ती
पाहून हा मुलगा अनुग्रह देण्यास योग्य आहे असा विचार करून
माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश
केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव 'भगवान' ठेवले.
त्याच्या मनात माणिकबाबांनी अध्यात्माला खतपाणी
घालून भक्तिभाव मजबूत रुजवला. माणिकबाबांकडून
घेतलेल्या गुरूपदेशाची कठोर साधना आबाजीने केली. नाथ
संप्रदायाप्रमाणे गुरूशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही.
भगवानबाबांना गुरूपदेश देणारे गुरु माणिकबाबा मिळाले व
भगवानबाबांचे जीवन कृतार्थ झाले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट
नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते
सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले.
माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा
पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट
स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर
आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर
भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी,
नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
----------------------------------
This information comes from message and I shared with all.

Subscribe to:
Posts (Atom)